आपला जिल्हा

गडचिरोली येथे पत्रकार दिन उत्साहात 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकार दिन गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.

स्थानिक विश्राम गृह येथे संपादक संघर्ष कडून आयोजित कार्यक्रम मध्ये शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्पण कार यांना आदरांजली वाहिली.तसेच याप्रसंगी NDTV छत्तीसगडचे पत्रकार मुकेश चंद्रकान्त यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी जिल्हाvमाहिती अधिकारी गजानन जाधव जाधव. पत्रकारासाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा. – पत्रकारांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनाचा पत्रकारांनी फायदा घ्यावा. आपले वृत्तपत्र चांगले चालण्यासाठी धारदार लेखणीने चांगल्या बातम्या लिहाव्यात अश्या प्रकारचे मार्गदर्शन बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी केले.

दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ पत्रकार केशवराव दशमुखे , हेमंत डोर्लीकर, मुकुंद जोशी,उदय धकाते, विजयाताई इंगळे , रेखाताई वंजारी आदि लाभले होते.

याप्रसंगी हेमंत डोर्लीकर यांनी दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार क्षेत्रातील पहिले पत्रकार होते. म्हणुन त्यांचा जन्मदिन साजरा करून त्यांच्या जंयतीदिनी पत्रकारांनी वाचक वाचेल अशी बातमी घ्यावी तरच पत्रकार हा खरा पत्रकार ठरू शकतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी तर आभार उदय धकाते यांनी मानले.

महाभारत न्यूजचे संपादक उदय धकाते दर्पणकार यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतांना

या कार्यक्रमांस विजय लडके , जगदिश कन्नाके , श्रीमंत सुरपाम , विजय सडमाके, अनुप मेश्राम, अनिल बोदनकर कृष्णा वाघाडे, तन्मय देशपांडे, तिलोत्तमा हाजरा, मुकेश गेडाम, दुधे, हजारे, किशोर खेवले, निलेश सातपूते ,जिमाकाचे महादेव बसेना, दिनेश वरखडे ‘वामन खंडाईत, आदि बहुसंख्य साप्ताहिकाचे व गामा चे पत्रकार उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker