ताज्या घडामोडी

आदिवासी महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

गडचिरोली,प्रतिनिधी :- 

गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथील पोलीस मदत केंद्र येथे एका आदिवासी महिलेस मारहाण करून तिच्यावर गुन्हा दाखल केल्याचा प्रकरण उघडकीस आले आहे. सदर पिडीत महिलेने पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.

पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गोडसे यांनी अवैध दारू विक्री प्रकरणात सदर महिलेचे पतीस चौकशी करिता मदत केंद्रात बोलवून घेतले तसेच त्यांची पत्नीला सुद्धा बोलाविण्यात आले. पोलिसांनी पूर्वीच लिहिलेल्या एफआयआर सही मारण्यास पिडीत आदिवासी महिलेवर दबाव आणला,सदर आदिवासी महिला  हि शिक्षित असल्याने तिने स्वाक्षरी करण्यास नकार देताच पोलीस उपनिरीक्षक गोडसे यांनी तिला मारहाण केल्याचा  आरोप सदर महिलेने केला असून तिने या बाबत पोलीस अधीक्षक  आणि पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन,गडचिरोली यांचेकडे लेखी तक्रार माया मंगेश मडावी यांनी केली आहे. या वेळी तिचे पती मंगेश मडावी हे पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

या बाबत  पोटेगाव येथील पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker