ताज्या घडामोडीदेश विदेश

गडचिरोलीत ११ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण; नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून आज ११ वरिष्ठ माओवाद्यांनी पोलीस व सशस्त्र दलासमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये उच्च पदांवरील माओवाद्यांचा समावेश असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये सोनी उर्फ बाली वत्ते मट्टामी, बुदरी उर्फ रामबत्ती आयतु मट्टामी, सुखलाल बोळगा कोक्सा, शांती उर्फ सोमरी गंगा तेलामी, यमुनक्का उर्फ रुखमाक्का पोट्टी पेंदाम, गणेश उलगे कोवासी, मिनको उर्फ जमनी काया मट्टामी, धनु दसरू वेळंजे, सुनिता उर्फ वंगे वत्ते होयाम, रमेश पांडू मडावी आणि किशोर सुक्रैय्या वासम यांचा समावेश आहे.

या सर्व माओवाद्यांवर शासनाने एकूण सुमारे ६८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस व सशस्त्र दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आणि शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे २०२५ पासून आतापर्यंत १२३ माओवाद्यांनी शस्त्र टाकली आहेत.

या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सशस्त्र दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोकुल राज, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे तसेच पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे उपस्थित होते.

जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता केवळ सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली असून, सातत्याने होत असलेल्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

या प्रसंगी अधिकाऱ्यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker