आपला जिल्हाताज्या घडामोडी

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महिलांची भव्य बाईक रॅली; दहाव्या वर्षीही उत्साह कायम

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आधारविश्व फाउंडेशन, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी महिलांची पारंपरिक बाईक रॅली यंदाही दहाव्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडली. मागील दहा वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही जोशपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा स्व. गीता हिंगे यांनी जिल्ह्यात महिलांसाठी सुरू केलेली ही रॅलीची परंपरा संस्थेने सातत्याने जपली आहे. यावर्षी आधारविश्व फाउंडेशन व लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र मासारंभानिमित्त मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी ही रॅली काढण्यात आली.

रॅलीची सुरुवात गडचिरोलीच्या नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर आणि माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून करण्यात आली.

या रॅलीत आधारविश्व फाउंडेशनच्या सचिव प्रा. सुनिता साळवे, उपाध्यक्ष प्रा. विणा महाजन, सदस्या प्रा. विजया मने, सदस्या सुचिता धकाते तसेच लोकमत सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, लोकमत कॅम्पस क्लबच्या भाग्यश्री गड्डमवार यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी नगरसेविका सीमा कन्नमवार, शिल्पा हेमके, अवंती धंदरे, मीरा कोलते, अलका कत्रोजवार, डॉ. प्राची साळवे, डॉ. साक्षी साळवे, प्रतीक्षा साळवे, माधुरी दहीकर, अंजली कुळमेथे, गायत्री गेडाम, प्रिती मेश्राम, उज्वला करपे, राणी गोपशेट्टीवार आदींची उपस्थिती होती.

महिलांनी पारंपरिक वेशभूषेत स्कुटी रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. या रॅलीमुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून महिला सशक्तीकरणाचा संदेशही देण्यात आला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker