आपला जिल्हाताज्या घडामोडी
कनिष्ठ प्रशासन अधिकारी विश्वनाथ दूधबळे यांना भावपूर्ण निरोप

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय, जिल्हा परिषद गडचिरोली येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. विश्वनाथभाऊ विठ्ठलराव दूधबळे हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सेवेतून सेवानिवृत्त झाले. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या सेवेला याच कार्यालयातून सुरुवात करून याच ठिकाणी आपल्या कार्याचा समारोप केला.
त्यांच्या सन्मानार्थ गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर सेवक संघटनेच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांनी भूषविले. यावेळी अधीक्षक (वेतन पथक) विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी अमरसिंह गेडाम, तसेच संघटनेचे अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी श्री. दूधबळे यांच्या दीर्घ व प्रामाणिक सेवेला उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कामातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि सहकाऱ्यांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध यांची सर्वांनी प्रशंसा केली.
यावेळी कार्यालयातील कर्मचारीवृंद तसेच शिक्षकेत्तर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्री. दूधबळे यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
समारंभास हेमंत रामटेके, भूपेश वैरागडे, अभिषेक शिवणकर, राजू मुंगेलवार, राकेश हेडाऊ लाडवे, अरुण धोडरे आदी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



