ताज्या घडामोडीसामाजीक

Invalid BOQ’ चा बनाव? दिना प्रकल्पाची निविदा वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आक्रमक!

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चामोर्शी तालुक्यातील दिना प्रकल्पांतर्गत विश्रामगृह दुरुस्तीच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप होत आहे. ‘Invalid BOQ’ या तांत्रिक त्रुटीचे कारण पुढे करून कंत्राटदारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, ही निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केली आहे.

​नेमका प्रकार काय ?

​निविदा क्र. २६/२०२६-२७ अंतर्गत विश्रामगृह दुरुस्तीचे काम प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये वि. बी. बोम्मवार, आर. व्ही. शेट्टे, पी. एम. वायलालवार यांसह अनेक कंत्राटदारांनी सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला. कंत्राटदारांच्या दाव्यानुसार, त्यांच्या खात्यातून ईएमडी (EMD) रक्कम कापली गेली, मात्र BOQ (Bill of Quantities) अपलोड करताना वारंवार ‘Invalid BOQ’ असा मेसेज येत होता. तांत्रिक त्रुटीमुळे अनेक कंत्राटदारांना अर्ज पूर्णच करता आले नाहीत.

​कंत्राटदारांना डावलण्यासाठी तांत्रिक खेळी ?

​काही विशिष्ट कंत्राटदारांना फायदा मिळवून देण्यासाठी आणि इतरांना स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी हा तांत्रिक अडथळा जाणीवपूर्वक निर्माण केला गेला का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, विभागीय कार्यालयाकडे तक्रार करूनही प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नसल्याने पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​संघटनेचा आंदोलनाचा इशारा :-

​राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी अध्यक्ष मनीषा मडावी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

“जर निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली गेली नाही आणि तांत्रिक त्रुटींची चौकशी झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संघटनेने दिला आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker