आपला जिल्हाताज्या घडामोडी

दिना धरणाजवळील मा. सा. कन्नमवार इको पार्कच्या विकासासाठी निधीची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चामोर्शी तालुक्यातील दिना धरणालगत वसलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ मा. सा. कन्नमवार इको पार्क गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्य सरकार व वन विभागाच्या माध्यमातून सन 2014-15 मध्ये या ठिकाणी विविध विकासकामे करण्यात आली होती. मात्र, योग्य देखभाल व नियोजनाच्या अभावामुळे आज हे इको पार्क धुळखात पडले असून पर्यटकांनीही या स्थळाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

या इको पार्कमध्ये पूर्वी उभारण्यात आलेल्या विविध शोभेच्या वस्तू चोरीला गेल्या असून अनेक ठिकाणी साहित्य जीर्ण व तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने पर्यटनावर विपरीत परिणाम झाला आहे. एकेकाळी जिल्ह्यातील शेकडो पर्यटक दररोज या ठिकाणी भेट देत होते, मात्र सध्याच्या दुर्लक्षित अवस्थेमुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

सदर इको पार्कचा सर्वांगीण विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटकांना उत्तम पर्यटनस्थळ उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे वन विभागाने पुढाकार घेत येथे आवश्यक मूलभूत सुविधा पुन्हा निर्माण कराव्यात, अशी मागणी होत आहे. विशेषतः वॉल कंपाउंड, स्वच्छतागृह, उपहारगृह, विश्रामगृह, अंतर्गत रस्ते, नाल्या, बारमाही चौकीदार तसेच विविध सौंदर्यीकरण विकासकामांसाठी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या मागणीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी तसेच स्थानिक पदाधिकारी सुमेन विश्वास, सुकंठ रॉय, पलाश घरामी, विनोद किरमे, राजू सातपुते, रमेश लेकलवार, संदीप भोवरे आदींनी पुढाकार घेतला आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker