गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, तेथील विदारक परिस्थिती पाहून प्रशासनाला धारेवर धरले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जेवणाच्या दर्जाबाबत तसेच मेसमधील गंभीर समस्यांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत आमदार डॉ. नरोटे यांनी तात्काळ स्वयंपाकगृहाची पाहणी केली. यावेळी उघड्यावर फेकलेले अन्न, मेसमध्ये अस्वच्छ अवस्थेत पडलेली भांडी तसेच सर्वत्र पसरलेली घाण पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विद्यापीठ प्रशासन इतके उदासीन कसे राहू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मेस कंत्राट व देखभालीत कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत त्यांनी प्रशासनाला तात्काळ वसतिगृहाची स्वच्छता करून मेसच्या दर्जात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढील कठोर पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खट्टी, कुलसचिव हिरेकनजी, सिनेट सदस्य सतीश चिचघरे, रुपेंद्र गौर, स्वरूप तारगे तसेच अरुण प्रकाश उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button