आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन
जागतिक सायकल दिनानिमित्त ७ जूनला आष्टी येथे भव्य सायकल रॅली
‘संडे ऑन सायकल’ उपक्रमातून फिट इंडिया अभियानाला चालना

गडचिरोली,प्रतिनिधी :-
नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक सायकल दिनानिमित्त ७ जून २०२६ रोजी ‘Sunday on Cycle’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात येत असून जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फिट इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून सायकलिंग हा त्यातील महत्त्वाचा घटक मानला जातो.
जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘Sunday on Cycle’ उपक्रम केंद्र पुरस्कृत खेलो इंडिया आर्चरी केंद्र तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.



