आपला जिल्हाताज्या घडामोडी
पोरला येथे ग्राहक जनजागृती व सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली,प्रतिनिधी :-
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने ९ ऑगस्ट २०२६ रोजी मौजा पोरला येथे ग्राहक जनजागृती व सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री. उदय धकाते, जिल्हा सचिव श्री. अरुण पोगळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय साळवे तसेच कार्यकारिणी सदस्य श्री. बळवंत येवले उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे हक्क, बाजारपेठेत होणारी फसवणूक आणि ग्राहक म्हणून तक्रार निवारणाचे अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहकांनी कोणतीही वस्तू किंवा सेवा घेताना जागरूक राहून आपले हक्क जाणून घेणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




