आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

‘वंदे मातरम्’च्या अवमानाविरोधात भाजपचे गडचिरोलीत निषेध आंदोलन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रभावनेचे प्रतीक असलेल्या गीताच्या कथित अवमानाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष, गडचिरोलीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी संबंधित प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत राष्ट्रभावना आणि स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा सन्मान राखण्याची मागणी करण्यात आली.

८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने या गीताचा अवमान हा केवळ गीताचा अपमान नसून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा अवमान असल्याची भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

‘वंदे मातरम्’ हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा व्यक्तीचे नसून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी आणि राष्ट्रभावनेशी जोडलेले गीत आहे. त्यामुळे अशा विषयावर राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन राष्ट्रभावनेचा सन्मान राखला पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनादरम्यान सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. ‘देश मोठा की परिवार?’ आणि ‘राष्ट्रभावना मोठी की राजकीय अहंकार?’ असे सवाल उपस्थित करत आंदोलकांनी आपली भूमिका मांडली.

या निषेध आंदोलनात भाजपचे माजी खासदार डॉ. अशोक  नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे,माजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, जेष्ठ नेते प्रमोद पिपरे,बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, उपाध्यक्ष निखिल चरडे, अनिल कुणघाडकर, आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker