आपला जिल्हाताज्या घडामोडी

वैनगंगेच्या तीरावर प्रथमच ‘महागंगा पूजा-आरती

मार्कंडा देवस्थानात भक्तिमय वातावरण

गडचिरोली, प्रतिनिधी :-

‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील ऐतिहासिक मार्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर प्रथमच ‘महागंगा पूजा-आरती’ भक्तिमय वातावरणात पार पडली. मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, श्रावणातील प्रत्येक सोमवारी महागंगा पूजा-आरती होणार आहे.

यावेळी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी मार्कंडेश्वर मंदिरात विधिवत पूजा-अर्चना व आरती केली. त्यानंतर वैनगंगा नदीच्या तीरावर मंत्रोच्चार, ‘ॐ नमः शिवाय’ व महामृत्युंजय मंत्राच्या पठणात गंगापूजन करण्यात आले.

शंखनाद, डमरूचा निनाद आणि ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात महाआरती संपन्न झाली. नदीच्या प्रवाहासमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आलेल्या आरतीमुळे परिसर भक्तिमय झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक सुनील मित्रा, अनिरुद्ध पालकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी अविशयांत पंडा, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे यांच्यासह विविध पदाधिकारी, महाराज मंडळी आणि हजारो भाविक उपस्थित होते.

 

महागंगा पूजा-आरतीच्या या नव्या उपक्रमामुळे मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक व आध्यात्मिक वैभवात आणखी एक नवा अध्याय जोडला गेल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker