आपला जिल्हाताज्या घडामोडी

सिरोंचात डासांचा प्रादुर्भाव; फॉगिंगसह स्वच्छतेची काँग्रेसची मागणी

सिरोंचा, प्रतिनिधी :-

सिरोंचा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नगरपंचायतीने तातडीने संपूर्ण शहरात फॉगिंग व ब्लीचिंग पावडरची फवारणी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

पावसाळ्याला दोन महिने उलटूनही शहरात नियमित फॉगिंग सुरू नसल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

श्रावण महिन्यात शहरातील श्रीराम मंदिर, श्री विठ्ठलेश्वर मंदिर, श्री बालाजी मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, पोचम्मा मंदिर तसेच दर्गा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने या परिसरांची विशेष स्वच्छता करून ब्लीचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

प्रशासनाने तातडीने फॉगिंग व स्वच्छतेची कार्यवाही न केल्यास नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीच्या नावाने निधी गोळा करून ब्लीचिंग पावडरची फवारणी व फॉगिंग करण्याचा अभिनव निषेध करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन या मागणीवर काय कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker