क्राईम

गडचिरोलीत १२ लाखाची दारू जप्त 

गडचिरोली,प्रतिनिधी :-

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने 02 चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 12,05,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केली आहे. यामुळे अवैध दारू विक्रेताचे धाबे दणानले आहे.

आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक – 2024 च्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता ब­याच दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्रातून गडचिरोली जिल्ह्रात अवैद्य दारु पुरवठा करून जिल्ह्राच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते. त्याद्वारे मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकुण निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण होत असते.

स्थानिक गुन्हे शाखेची चमू आगामी निवडणुक 2024 च्या पाश्र्वभुमिवर गडचिरोली परिसरात गस्त करीत असतांना दिनांक 12/11/2024 रोजी गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाली की, गडचिरोली शहरातील गोकुळनगर परिसरातील अवैद्य दारु विक्रेता नामे आकाश भरडकर हा त्याचा साथीदार नामे रोशन लोखंडे याच्या मदतीने मौजा ब्राम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर येथून गडचिरोली परिसरात अवैद्य देशी व विदेशी दारुची वाहतुक करून आगामी विधानसभा निवडणुक – 2024 च्या पाश्र्वभुमीवर मनोज मुजुमदार व क्रिष्णा मुजुमदार यांना पुरवठा करणार आहे.

सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरेड्डीवार इंजिनिअरींग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचून असतांना खबरेतील दोन वाहने समोरून येतांना दिसताच त्यांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारुचे 130 खरड¬ांचे बॉक्स मिळून आले. सदर दारुचे बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण 12,05,000/- रु. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून वाहनातील आरोपी नामे आकाश भाऊराव भरडकर, रा. गोकुळनगर, रोशन हरिदास लोखंडे, रा. उंदरी, ता. उमरेड, जि. नागपूर यांना अटक करून त्यांचे व पाहिजे असलेले आरोपी नामे मनोज मुजुमदा, रा. एटापल्ली व क्रिष्णा मुजुमदार, रा. कसनसुर यांचे विरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – 2024 अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपली असतांना स्थानिक गुन्हे शाखेने 130 देशी दारुचे बॉक्स व वाहने जप्त केल्याने कसनसुर व एटापल्ली सारख्या दुर्गम भागात निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि. राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोअं प्रशांत गरफडे, नामदेव भटारकर, चापोअं दिपक लोणारे यांनी केलेली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker