देश विदेशमहाराष्ट्र

सिरोंचा, मेडाराम, झिंगानुर परिसरात भुकंपाचे सौम्य झटके

गडचिरोली,प्रतिनिधी :-

दिनांक 29.10.2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यांमध्ये सिरोंचा, मेडाराम, झिंगानुर परिसरात भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत.

तसेच दि.28.10.2022 रोजी चे रात्री 11.30 ते 12.00 वाजता चे दरम्यान अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, मरपल्ली,जोगनपुडा, तिमरम या गावांमध्ये भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहे. वरील दोन्हीही सिरोंचा व अहेरी तालुक्यात जाणवलेल्या भुकंपाचे झटक्यामुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी झालेली नाही.

सदर भुकंपाची तिव्रता रिक्टर स्केल वर  3.8 तसेच भुकंपाची खोली 10 कि.मी. जमीनीखाली असल्याचे National Centre for Seismology New Delhi यांचेकडून माहिती झालेली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker