आरोग्य व शिक्षण
इंदिरा गांधी विद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

चंद्रपूर,प्रतिनिधी :-
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करुन त्यांच्यातील बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी 14 नोव्हेंबर 2022 रोजी बालदिनाचे औचित्य साधून पडोली येथील इंदिरा गांधी विद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन सुनील मुत्यालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात एकुण 37 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
यावेळी मुख्याध्यापक देवेंद्र मडावी, सुनिल मुत्यालवार, शिक्षक वरारकर, कष्टी, ढुमणे, चिंतलवार, पेटकर, काळे, श्रीमती आत्राम, श्रीमती चवले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली, यावेळी अध्यक्ष सुनिल मुत्यालवार यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.




