आपला जिल्हाताज्या घडामोडी

कारगील चौकात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील कारगील स्मारक येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार उदय धकाते यांच्या हस्ते करण्यात आले.

कारगील चौक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा व राजीव गांधी प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजीव गांधी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक तुषार निकुरे यांनी केले.

या प्रसंगी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर यांच्यासह संजय गद्देवार, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, बाळू मोटघरे, महादेव कांबळे, रामा हजारे, सुचिता धकाते, वनिता भांडेकर, संगीता धकाते, दुधे, मुख्याध्यापिका मीरा मडावी, प्रा. सुनीता साळवे, संजय लांजेवार, विजय सुरपाम, साहिल गोवर्धन, गणेश मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

कारगील चौक परिसरातील तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनाचा आनंद उत्साहात साजरा केला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker