क्रीडा व मनोरंजन

राज्य स्तरीय वरिष्ठ गट व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आष्टी येथे निवड चाचणी सामने

गडचिरोली,प्रतिनिधी :-

       ऑलम्पिक असोसिएशन संलग्नित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन द्वारा आयोजित 53 वी राज्य स्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दि.15 ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित केलेल्या आहेत,सदर स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ सहभागी राहणार आहेत.

निवड चाचणी सामान्य च्या अधिक माहिती साठी अमित शेंडे 9405508828,आदर्श खंडारे 9370477620,संदीप रामटेके 9307678855 यांचेशी संपर्क साधावा.

            गडचिरोली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ निवडण्या साठी दि. 11डिसेंम्बर 2022 रोज रविवार ला सकाळी 11 वाजता एम.जे.एफ व्हॉलीबॉल क्लब आष्टी जिल्हा गडचिरोली च्या मैदानावर एक दिवसीय निवड चाचणी सामने घेण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व पुरुष व महिला खेळाडूंनी सदर निवड चाचणी सामन्यात सहभागी होऊन गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल संघ निवडण्यासाठी सहकार्य करावे अशे आवहान महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष व गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन चे सचिव सतीश पवार,अध्यक्ष अनिल पोरेड्डीवार, उपाध्यक्ष,महेश राऊत,कोषाध्यक्ष,रवी नंदनपवार,सदस्य, नितीन जेंगठे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker