सामाजीक

राजमुद्रा युवा प्रतिष्ठाण च्या वतीने टी पॉईंट चौकात शिवजन्मोत्सव सोहळा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

       राजमुद्रा युवा प्रतिष्ठान कॉम्प्लेक्स गडचिरोलीच्या वतीने दिनांक 16 ते 19 फेब्रुवारी पर्यंत शिवजन्मोत्सव सोहळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला तसेच काल 19 फेब्रुवारी भव्य रॅली काढून व विविध कार्यक्रमाचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

      कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवराव होळी, मार्गदर्शक म्हणून विधान परिषद सदस्य आमदार अमोल दादा मिटकरी संविधानाचे अभ्यासक डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे कार्यक्रमाचे आयोजक रणजीत रामटेके समीर बनकर दीपक दिकोंडावार प्रामुख्याने उपस्थित होते.

        या कार्यक्रमात सर्वप्रथम आमदार अमोल दादा मिटकरी यांचे शिवचरित्रवर जाहीर व्याख्यान झाले त्यानंतर संविधानाचे अभ्यासात डॉक्टर प्रेम कुमार खोब्रागडे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला त्यानंतर आमदार डॉक्टर देवराव होळी व भाजप जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली .यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व शिवजन्मोत्सव सोहळ्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिक, महिला व युवक उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker