सामाजीक

टायगर ग्रुप च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

टायगर ग्रुप गडचिरोलीच्या वतीने चंद्रपूर मार्गावरील खुल्या मैदानावर शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टायगर ग्रुप चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. डॉ.तानाजी जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेचे विदर्भाचे नेते किरण पांडव, गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवराव होळी भाजपचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, टायगर ग्रुप पुणेचे अध्यक्ष अनिकेत घुले, मराठवाडा अध्यक्ष उमेश पोखरकर, मिस्टर विदर्भ सोनू वाटमारे, नांदेड चे अध्यक्ष बाळू जाधव,नागपूर जिल्हाप्रमुख प्रशांत नखाते, अहमदनगर चे अध्यक्ष साहिलदादा काझी, गडचिरोली चे जिल्हाप्रमुख दीपक भारसाकडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे हेमंत जम्बेवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अनुराग पिपरे व टायगर ग्रुप चे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचे 50 फुटाचे ब्यानर क्रेनद्वारे उभारण्यात आले. त्यानंतर गांधी चौकातून चंद्रपूर मार्गावर शिवाजी महाराजांच्या पालखी व विविध झाक्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीत शिवाजी महाराजांच्या कार्याचे वर्णन करणारी हुबेहूब झाकी तयार करण्यात आली. या रॅलीमध्ये गडचिरोली शहरातील नागरिक महिला युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker