सामाजीक
पोमके धोडराज पोलीसांनी दिला मदतीचा हात

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली पोलीस दल “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्रातील धोडराज यांनी मौजा कुरचेर येथील लालसु डोलु ओक्सा यांचे घर अचानकपणे लागलेल्या आगीमुळे पुर्णतहा जळुन खाक झाले. त्यांना पोमके धोडराज येथील पोलिसांनी मदत करून मानवतेचा परिचय दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लालसु डोलु ओक्सा यांचे दैनंदिन लागणारे आवश्यक राशन व जिवनावश्यक वस्तु तसेच शेती उपयोगी साहित्य व ईतर साहित्य जळाले असल्याने त्यांचा निवासाचा व उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला होता .

निराधार व आर्थिक दृष्ट्याा सक्षम नसल्याचे निवा-याची साधन उपलब्ध करु शकत नसल्याबाबतची माहिती मौजा कुरचेर च्या ग्रामस्थांनी च्या ग्रामभेटीत पोउपनि सुर्यवंशी यांना दिली असता पोमके धोडराज येथील प्रभारी अधिकारी यांना माहिती मिळाल्यानंतर सदर व्यक्तीला मदतीचा एक हात म्हणुन पोमके धोडराज मधील सर्व अधिकारी व अंमलदारांना माहिती देवुन मदत करण्याचे आवाहन केल्याने सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लालसु डोलु ओक्सा यांना निवासाकरीता घराचे नविन बांधकाम तयार करुन देण्यासाठी मदत केली.



