सामाजीक

“सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष” म्हणजे राजषि शाहू महाराज- प्रविण मुक्तावरम

गडचिरोली,प्रतिनिधी :-

अनेक लोकोपयोगी कार्य व धाडशी निर्णय घेऊन लोकांना न्याय दिला म्हणून राजर्षी शाहूमहाराज हे एक सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरूष होते असे विचार प्रविण मुक्तावरम् यांनी व्यक्त केले.

श्री गुरुदेव योग शिक्षण व सेवा समिती व संत नगाजी महाराज मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत नगाजी महाराज मंदिर येथे राजर्षी शाहूमहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त “सामुदायिक प्रार्थना” व विचार प्रकटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी सुनील चडगुलवार से. नि. तहसीलदार यांनी शाहूमहाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. व त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.याप्रसंगी १०० सेकंद मौन बाळगून श्रध्दांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी खुशरंग शेंडे अध्यक्ष नगाजी महाराज मंदिर,देवेंद्र दहिकर से.नि.तहसीलदार,रामा नराते, महागु तुराटे, सदाशिव कुदरपवार.काशिनाथ दैवलकर,मनोहर कुदरपवार, विजय गिरसावळे, मधुकर विधाते, अमलकृष्ण हलधर, अरुण बोडखे, ज्ञानेश्वर बांबल, दिनकर नक्षिने, प्रभाकर लांडगे, नामदेवराव ईजनकर, रेखा वाटेकर, माया गिरसावळे, शालु शेंडे, गंगा तायवाडे, रेखा सुर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम आयोजन व नियोजन प्रविण मुक्तावरम यांनी केले.राष्ट्रवंदना घेऊन सांगता करण्यात आली.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.