गडचिरोली,प्रतिनिधी :-
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी व मूलचेरा या तीन तालुक्यातील करोडो रुपयांचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्यासंदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी गठित केलेल्या समितीच्या अहवालामध्ये या तीन पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आढळलेले आहेत. त्यामुळे या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार भामरागड पंचायत समितीतील गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी, शाखा अभियंता,नरेगा तांत्रिक अधिकारी (टि पी ओ) तसेच बोटनफुंडी, ईरूपडूम्मे, मडवेली, मन्नेराजाराम ,येचली ,पल्ली, या ६ ग्रामपंचायतीचे सचिव, असे एकूण १० अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत.
अहेरी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी, शाखा अभियंता ,नरेगा तांत्रिक अधिकारी (टि पी ओ) तसेच मनोहर ग्रामपंचायतीचे सचिव असे एकूण ५ अधिकारी व कर्मचारी जोशी आढळलेले आहेत.
मुलचेरा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी, शाखा अभियंता ,नरेगा तांत्रिक अधिकारी (टि पी ओ) विवेकानंदपूर सुंदरनगर शांती ग्राम व येल्ला ग्रामपंचायतीचे सचिव असे एकूण ८ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत.
त्यामुळे या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली असून या संदर्भात प्रशासनाने कारवाई न केल्यास जिल्हा परिषद गडचिरोली च्या समोर ११ जुलैपासून ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia