महाराष्ट्रराजकीय

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-

विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये …

छगन चंद्रकांत भुजबळ,  दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, हसन मियालाल मुश्रीफ,  धनंजय पंडितराव मुंडे,  धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम,  आदिती सुनील तटकरे,  संजय बाबूराव बनसोडे,  अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker