क्राईम

वन कर्मचारी च्या अमानुष मारहाणीत एकाचा मूत्यू

गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सुर्यापल्ली येथील रेड्डी बुच्चम जाडी याला वन कर्मचारी यांनी अमानुष मारहाण केल्याने त्याचा मूत्यू झाल्याने वन विभागाच्या कर्मचारी वर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृतकाचा भाऊ चिन्नालचन्ना बुचय्या जाडी आणि बहिण दुर्गु दुर्गय्या जीमडे यांनी जिल्हाधीकारी मीना यांच्या कडे केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि,मृतक रेड्डी बुच्चम जाडी हे  कुमरी सली, देवेंद्र जंगम, कोगल्ली सुनतकर व दुदम सूनु हे 24 जून 2023 रोजी रात्री मौजा आदीमुत्तापूर तह. सिरोंचा येथील जंगलालगत कामानिमित्य गेले होते. तिथे वन कर्मचारी यांनी त्यांना पकडले व त्यातील एका व्यक्तिने रात्रभर मयत रेड्डी बुच्चम जाडी याला अमानुष रित्या  मारहाण केले. त्यानंतर सकाळी 4 वाजता च्या सुमारास त्यांना घरी जाण्यास सोडले होते.

सकाळी हि घटना घरच्या लोकांना माहिती होताच त्याची प्रकृती नाजूक झाल्याने  रेड्डी बुच्चम जाडी यास एम.जी.एम. मंचेरल राज्य तेलंगणा येथे उपचारा करिता भरती केले असता. 28 जून 2023 रोजी त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला.

दि. 29 जून 20:23 रोजी मयत रेड्डी बुच्चम जाड़ी घरी घेवून येवून त्याचा अंतिम संस्कार केले. त्याच दिवशी सकाळी 11 व 12 च्या दरम्यान पोलिस अधिकारी आले व मयत रेड्डी बुच्चम जाडी हे कसा मरण आपला म्हणून श्री. पन्ना याला विचारपूस केली. गत रेड्डी बुच्चम जाडी यांनी दफन केलेल्या जागेवर घेवून गेले. त्यानंतर पोलिसांनी पोलिस स्टेशन येथे बोलावले आणि बयाण घेतले त्यावेळी आम्ही काय बयाण दिले आम्हाला समजले नाही. श्री. चन्ना व त्याचे कुद्वय हे दुःखात असल्याने पोलिसांनी घटनेची वास्तविक माहिती देवू शकले नाही अशी माहिती त्यांनी जिल्हाधीकारी यांना  दिलेल्या निवेदनात लेखी दिले आहे.

सदर दोषी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची दाट शक्यता असल्याने तसेच पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र सुरू होण्याअगोदर तात्काळ कार्यवाही करून दोषींवर कलम 34 302 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करून पिडीत कुटूबियांना न्याय देण्यात यावे.अशी मागणी केली आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.