महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हुकुमशाह, घरचा अहेर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा गडचिरोली च्या जिल्हाध्यक्ष पदावर भाजप रासप युती चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य नसलेल्या अतुल गण्यारपवार व्यक्तीला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चक्क हुकुमशाह संबोधन करून राष्ट्रवादी पक्षातील एका बड्या नेत्याने घरचा आहेर दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्व म्हणून ओळखल्या जाणारे विद्यमान मंत्री धर्मराव आत्राम यांनी अजित पवार यांच्या गटात गेल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये फुट पडली.जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर हे धर्मराव आत्राम यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांनी त्यांचे बोट पकडल्याने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे येथील जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते.

नुकताच गडचिरोली येथे  माजी गुह्मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चा मेळावा घेण्यात आला होता.यात   जिल्हाध्यक्षपदावर अतुल गण्यारपवार   यांची निवड होईल हे निश्चित झाले होते. नुकतेच त्यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.या  नियुक्तीने येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून शरद पवार यांचे निष्ठावान असे नाव लौकिक असलेले कार्यकारी अध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी सोशल मिडिया मधून जाहीर नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चक्क हुकुमशाह संबोधन करून खळबळ उडवून दिली आहे. तसेच अतुल गण्यारपवार यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी असा इशारा सुद्धा दिला आहे.

प्रकाश ताकसांडे काय म्हणतात कि,

 आदरणीय जयंत पाटील साहेब,प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश.साहेब, आपण हुकुमशाही पध्दतीने नक्षलग्रस्त,आदिवासी,अतिमागास,बहुसंख्य बहुजन, आदिवासी,ओबीसी,दलित,मागासवर्गिय व अल्पसंख्यांकांचे वास्तव्य असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा गडचिरोली च्या जिल्हाध्यक्ष पदावर भाजप रासप युती चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य नसलेल्या ओबीसी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक,बहुजन विरोधी प्रतिगामी विचाराचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले भ्रष्टाचारी गुन्हेगार प्रवृत्तीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य नसलेले अतुल गण्यारपवार यांची गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदावर घटनाबाह्य नियुक्ती हुकूमशाही पध्दतीने केल्यामुळे भारतीय संविधान,लोकशाही, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा,राजर्षी शाहू ,क्रातीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,क्रातीज्योती माता सावित्रीबाई फुले, विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर दृढ विश्वास असलेल्या  गडचिरोली जिल्ह्यातील बहुजन समाजातील ओ. बी.सी, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक तथा शोषित, पिडीतांवर अन्याय करणारा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुजन समाजाच्या एकनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवर अन्याय व अत्याचार करणारा असुन त्वरित जातीयवादी अतुल गण्यारपवार यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.ही नम्र विनंती. प्रकाश उध्दवराव ताकसांडे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा गडचिरोली.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.