क्राईम

बलात्कार करणा-या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व एक लाख रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी निर्णय दिला आहे.

        सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस ठाणे गडचिरोली हद्दीतील मौजा दर्शनीमाल गावात 30/05/2018 रोजीची हि घटना होती. पीडीत मुलगी ही आपले घरुन दुपारी 03.00 वाजताचे सुमारास घरी येत असतांना आरोपी अनिल कवडु मशाखेत्री वय 40 वर्ष रा. दर्शनीमाल याने लपुन बसुन होता त्याने बलात्कार केला. त्यामुळे पिडीता ही बेशुध्द पडल्याने, आरोपीने तीला गोठ¬ाजवळ असलेल्या संडासमध्ये डांबुन ठेवले. पीडीता ही घरी न आल्याने फिर्यादीने गावात व इतरत्र पीडीतेचा शोध घेतला असता मिळुन आली नाही. रात्रो 08.30 वा. दरम्यान फिर्यादीचा लहान मुलगा हा सायकल ठेवण्यासाठी घराजवळ असलेल्या गोठ¬ामध्ये गेला असता. गोठ¬ाजवळ असलेल्या संडासमध्ये त्याला पीडीतेची पांढ-या रंगाची ओढनी दरवाज्यातुन बाहेर दिसली. सदर बाब ही फिर्यादीला सांगताच तिथे फिर्यादीने जावुन पाहीले असता पीडीता ही बेशुध्द झालेल्या अवस्थेत मिळाली.

        अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोस्टे गडचिरोली येथे दि. 31/05/2018 ला अप क्र. 217/2018 अन्वये कलम 363, 376 (2) (3), व 342 भादवी तसेच कलम 4 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, तसेच अनुसुचित जाती जमाती कायदयान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस दि. 31/05/2018 रोजी अटक करुन केली.  तपास पुर्ण करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळुन आल्याने न्यायालयात स्पेशल केस क्र. 28/2018 अन्वये दोषारोप दालख करण्यात आले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद  न्यायालयाने ग्राह्र धरुन दि. 05/10/2023 रोजी आरोपी नामे अनिल कवडु मशाखेत्री वय 45 वर्ष रा. दर्शनीमाल यास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम 363, 376, (2) (3) 342 भादवी तसेच कलम 4 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, मध्ये दोषी ठरवुन 20 वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.

        सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तापस एसडीपीओ डॉ. सागर कवडे व मपोउपनि तेजस्वीनी संपत पाटील गडचिरोली यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.