गडचिरोली,प्रतिनिधी :-
आज दिनांक ०६/१२/२०२३ रोजी गांधी वार्ड क्रं ११, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथील आदिवासी परधान समाज मंदिर येथे वॉर्डातील नागरिकांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी परमपूज्य, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणवात प्रज्वलन करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत असे मत व्यक्त केले.
यावेळेस ॲड. बाळासाहेब आखाडे, महेंद्र मसराम,अजय काळे, रुपेश सलामे, विजय सुरपाम,राज डोंगरे, आकाश कुळमेथे, भावेश खोब्रागडे, महादेव कांबळे, रमेश हजारे, यांच्या सह वॉर्डातील इतर नागरिक उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button