क्राईम

चामोर्शी पोलीसांनी केला बनावटी देशी दारुसह मुद्देमाल जप्त

चामोर्शी,प्रतिनिधी:-

        गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द काल होळीच्या दिवशी चामोर्शी हद्दीतील मौजा जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी बनावटी देशी दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

       जुगल लखन दास, देवदास किसन मंडल, सुब्रातो विश्वास व इतर रा. नेताजी नगर (गाव क्रमांक 74) तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हे मोहा सळवा फुलाची दारु काढून अवैधरित्या विक्री करत  आहेत, अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक  पुल्लरवार यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका शिंदे सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच सदर इसम पळून गेले.

      घटनास्थळावर 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा फुल सडवा असे एकुण पाच हजार दोनशे लीटर अंदाजे किंमत 5,20,000/- चा मुद्देमाल आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाचे एकुण 116 प्लॅस्टीकच्या थैली त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा सडवा प्रमाणे 23 हजार 400 लीटर अंदाजे किंमत 23,40,000/- मोहा फुल सडवा असे एकुण 28 हजार 400 लीटर अवैध मोहा सडवा बाजार भाव विक्री किंमत 100 प्रती लीटर प्रमाणे एकुण 28,40,000/- चा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मोक्यावर रीतसर सॅम्पल घेऊन वेळीच घटनास्थळी पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. 

     आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. राधिका शिंदे करीत आहेत.

 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.