महाराष्ट्र

निवृत्तीवेतन मिळणार ई-कुबेर प्रणालीद्वारे

गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे मार्च-2024 पासून पुढील निवृत्तीवेतन व कुटूंबनिवृत्तीवेतनाचे प्रदान आता दरमाह ई-कुबेर प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे.

निवृत्तीवेतनधारकांनी कोषागाराचे निवृत्तीवेतन प्रणालीत ज्या बँकेची नोंद केली आहे ते खाते सुरू राहील याची दक्षता घ्यावी. तसेच ज्यांनी कोषागारास न कळविता परस्पर निवृत्तीवेतनखाते बदल केला आहे त्या निवृत्तीवेतनधारकांनी बँकेचा आय.एफ.एस.सी. कोड व खाते क्रमांक कोषागार प्रणालीत अद्यावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी लक्ष्मण लिंगालोड यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.