आपला जिल्हा

एलएमईएलने जोडला महिला सक्षमीकरण आणि कार्यबलातील लैंगिक समानतेचा नवीन अध्याय

गडचिरोली,प्रतिनिधी :-

महिला सक्षमीकरण आणि कार्यबलात लैंगिक समानतेचा नवा आदर्श प्रस्थापित करत, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने कोनसरी गावातील १९ महिलांना आपल्या कुशल कार्यबलात सामील केले आहे. हलकी मोटार वाहने चालविण्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता या महिलांना कंपनीत नोकरीची संधी मिळाली आहे.

या महिलांना यावर्षी जूनमध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलँड प्रशिक्षण केंद्रात ४५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान हलकी मोटार वाहने चालविण्याचे कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि जबाबदारीची जाणीवही त्यांनी दृढ केली. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांचा अभिमानही उंचावला आहे.

कोनसरी येथील लॉईड्स कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या स्वागत समारंभात एलएमईएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबोधित करताना सांगितले की – “समुदाय सक्षमीकरण हा एलएमईएलच्या यशाचा आधारस्तंभ आहे.

व्यवस्थापकीय संचालक  बी. प्रभाकरन यांच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकासाद्वारे स्थानिक महिलांना सबल करणे, कार्यबलात लैंगिक समानता सुनिश्चित करणे आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे या आमच्या ध्येयाचा भाग आहे.”

या प्रसंगी एलएमईएल परिवारात नव्याने सामील झालेल्या महिलांना नियुक्तीपत्रे, प्रशिक्षण प्रमाणपत्रे, वाहनचालन परवाने व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिलांना शिस्त, सुरक्षितता व जबाबदारीद्वारे प्रगतीची शिडी चढत उच्च स्थान प्राप्त करण्याचे मार्गदर्शनही केले.

या उपक्रमामुळे कोनसरी गावातील महिलांच्या जीवनात प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला असून, कार्यबलातील लैंगिक समानतेकडे हा टप्पा मोलाचा ठरला आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker