आपला जिल्हा

जिल्ह्यातील वि.जे.एन.टी च्या ४४० घरकुलांना मंजुरी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील वि.जे.एन.टी च्या ४४० घरकुलांना मंजुरी मिळाली असून गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेरीस यश मिळाले आहे.गडचिरोली चामोर्शी व धानोरा तालुक्यातील सर्वाधिक घरकुलांचा समावेश आहे.

मागील अनेक दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यातील बंजारा ,धिवर, भोई , केवट ,समाजातील घरकुल मंजूर व्हावे यासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने प्रयत्न करीत होते. यामध्ये गडचिरोलीचे समाज कल्याण विभागाचे अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनीही मोठे सहकार्य केले.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४४० घरकुलांना मंजुरी मिळाली असून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याकरिता आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

आता लवकरच या समाजातील गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून घराचे बांधकाम सुरू करण्यास आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker