साहित्यिक

सुरेश गेडाम यांच्या प्रतिबिंब काव्यसंग्रहाचे  सावलीत प्रकाशन

जि.प.उच्च प्राथमिक शाळा केरोडा येथील  शिक्षक कवी सुरेश गेडाम

सावली,प्रतिनिधी :-

यांच्या  प्रतिबिंब या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सावली येथील पंचायत समिती सभागृह सावली येथे संपन्न झाले. झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा द्वारा आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा प्रमुख डॉ. चंद्रकांत लेनगुरे  यांच्या हस्ते झाले. चंद्रपूर जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर, भाष्यकार म्हणून कवी प्रिती जगझाप, रामकृष्ण चनकापुरे, कवी सुरेश गेडाम आदी मान्यवराची प्रमुख उपस्थिती होती.  अरूण झगडकर  म्हणाले की, प्रस्तुत काव्यसंग्रहात विविध जाणिवांचे प्रतिबिंब उमटल्याचे सांगुन साहित्यातून अंतर्मनातील भावविश्वाचा विचार  प्रकट व्हावे असे निवेदन केले.

तर  प्रमुख भाष्यकार कवयित्री प्रीती जगझाप बल्लारपूर आणि रामकृष्ण चनकापुरे यांनी काव्यसंग्रहात  आलेला गणितीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला.  दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे  कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गडचिरोली चे ज्येष्ठ कवी डॉ. प्रविण किलनाके होते. 

कवयित्री सौ. शशिकला गावतूरे, श्रीकांत धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कवी संमेलनात लक्ष्मण खोब्रागडे, संजीव बोरकर, उपेंद्र रोहणकर, संतोषकुमार उईके, प्रशांत भंडारे, सुनील बावणे, सरिता गव्हारे, छाया टिकले, मनीषा मडावी, मंगला गोंगले, मालती सेमले, किरण चौधरी ,दुष्यंत निमकर , गणेश आसेकर, साक्षी राऊत, निधी चौधरी आदींनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मेश्राम आणि संगिता बांबोळे यांनी केले तर आभार वृंदा पगडपल्लीवार यांनी मानले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker