महाराष्ट्र

कारगील चौकात पुलवामा शाहिदांना आदरांजली

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील कारगील चौकातील शहीद स्मारक येथे पुलवामा येथील हल्लात शहीद झालेल्या भारतीय शूरवीर सैनिकांना आज मेणबत्ती व फुल वाहून आदरांजली वाहण्यात आली. 

 १४ फेब्रुवारी २०१९ ला सारा जग प्रेमाचा दिवस उत्साहात साजरा करित असताना आपल्यावर दिवस रात्र प्रेम करणारे भारतीय सैनिकावर जिवघेना हल्ला करून भीषण हत्याकांड घडवून आणले होते.

 आज आपण प्रेमाचा दिवस न साजरा करता आपण भारतीय सैनिकावरील प्रेम कायम ठेवू या, या उदात भावनेने कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ,गडचिरोली च्या वतीने शाहिदांना आदराजली वाहण्यात आली.

या वेळी कारगील चौकाचे अध्यक्ष उदय धकाते, नरेश चन्नावार,  पत्रकार सुरेश पद्मशाली,डॉ.नरेश बिडकर, सुनील देशमुख, सुचिता धकाते, मोबीन सय्यद, कालु गोवर्धन,रुपेश सलामे,मोगली मसराम,रोहित आत्राम, पोलीस जमादार  भुवनेश्वर गुरुनुले, प्रसाद पवार, संदीप कटकुरवार,मुंगेलवार,विलास जुवारे,विजय बारापात्रे,शरीफ शेख,भोजू,राजू डोंगरे,अजय शिडाम,अंकित कुळमेथे, महादेव कांबळे, तुषार दुधबळे, आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker