गडचिरोली,प्रतिनिधी :-
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. यात 26 व 27 जुलै रोजी रेड अलर्ट असून या कालावधीत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यांपासून दूर रहा. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा. खराब दृश्यवमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. पाणी दिसते त्या पेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्यात मोडतोड तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू्, भांडे, छिद्र किंवा विजेच्याक तारा असु शकतात. पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा.
वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करु नये विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असतांना फोनचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia