देश विदेश

ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गांसाठीच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी 394.61 कोटी रुपये

दिल्ली,प्रतिनिधी :-

इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBCs) आणि विमुक्त जमाती (DNTs) साठीच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्पीय तरतूद  250 कोटी रुपये एवढी होती, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये हीच अर्थसंकल्पीय तरतूद 394.61 कोटी रुपये एवढी वाढवण्यात आली आहे

ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत वर्ष 2021-22 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश पंधराव्या  वित्त  आयोगाच्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 5.67 कोटी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करणे आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker