महाराष्ट्र
सावरकर गौरव यात्रा गडचिरोली जिल्ह्यात येणार
गडचिरोली,प्रतिनिधी :-
स्वातंत्रवीर सावरकर यांच्या कामगिरीचे स्मरण देण्यासाठी राज्यभरात भाजपा आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा ची सुरुवात झाली असून ती नव्या पिढीला सावरकर यांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.
सदर हि यात्रा गडचिरोलीला ४ एप्रिल ला निघणार आहे.अशी माहिती आज गडचिरोली चे आमदार डॉ.देवराव होळी यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. यावेळी पत्रकार परिषदेल शिवसेनेचे संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, जिल्हा भाजपा महामंत्री प्रमोद पिपरे,गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,माजी नगरसेवक केशव निम्बोड,हेमंत बोरकुटे,वाढई,आदी उपस्थित होते.




