गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगाव येथे दिनांक 17 एप्रिल सोमवारी वाजताच्या दरम्यान एका विवाहित तरुणीला कुलर मध्ये पाणी भरत असताना शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.घटने मुळे नागरिकांनी उचित काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
सौ अश्विनी राकेश मुनघाटे( 27) रा.गोगाव ता. जि. गडचिरोली असे कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास नळ आले असताना अश्विनी हिने कुलर मध्ये पाणी भरत होती. कुलरच्या सर्व बटण पुर्णपणे बंद न करता पाणी भरत असताना सौ. अश्विनी ला विजेचा तीव्र धक्का लागला व तीचा दुदैवी मृत्यु झाला.
या घटनेने गोगावं परीसरात शोककळा पसरली असून तिला दीड वर्षाची एक मुलगी असल्याचे कळते.
सर्वत्र कुलरचा वापर वाढला असून कुलरमध्ये पाणी टाकताना सावधानता न बाळगल्यास जीवाची हानी होऊ शकते हे या घटने वरून सिद्ध होत आहे.यासाठी नागरिकांनी कुलरमध्ये पाणी टाकताना आवश्यक ती खबरदारी घेऊन कुलरची बटन पूर्णपणें बंद करूनच पाणी टाकावे व याकडे दुर्लक्ष करु नये.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia