क्राईमदेश विदेश

गडचिरोलीत 2 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

   एकुण 08 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षल

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोलीत एकुण 08 लाख रू. ईनामी असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांचे आज आत्मसमर्पण केले आहे यामुळे नक्षल सप्ताहला जोरदार झटका बसला आहे. जिल्ह्यात येत्या 28 जुलै ते 03 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी हे नक्षल शहिद सप्ताह दरवर्षी पाळतात.याच पार्श्वभूमीवर  दोन नक्षल नि आत्मसमर्पण केल्याने पोलीस दलाचे मनोधर्य वाढले आहे.

नुकतेच एकुण 08 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे अडमा जोगा मडावी, वय 26 वर्ष रा. जिलोरगडा, पो. पामेड तह. ऊसुर, जि. बिजापूर (छ.ग.) व टुगे कारु वड्डे, वय 35 वर्ष रा. कवंडे, पो. बेद्रे, तह. बैरामगड, जि. बिजापूर (छ.ग.) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

या सप्ताहामध्ये नक्षलवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे, खबरी असल्याच्या संशयावरुन निष्पापांच्या हत्या करणे, रस्ते बंद करणे, बंद पुकारणे, धमकावणे, अश्या हिंसक कारवाया करत असतात. शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. 

आत्मसमर्पीत सदस्याबाबत माहीती       

नामे अडमा जोगा मडावी

 

       दलममधील कार्यकाळ

1)      माहे जुलै 2014 ला पामेड एलजीएसमध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2021 पर्यंत कार्यरत होता.

2)      माहे जानेवारी 2021 ला झोन अॅक्शन टीममध्ये बदली होवून कार्यरत राहून माहे जुन 2023 ला दलम सोडुन घरी परत आला. 

       कार्यकाळात केलेले गुन्हे

        चकमक – 8, खुन – 5, जाळपोळ – 1 व इतर – 2 इ. गुन्ह्रात सहभाग.

     सन 2016 मध्ये मौजा बोटेतोंग जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. तसेच सन 2017 मध्ये मौजा बुरकापाल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. तसेच मौजा चिन्ना बोडकेल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. यावेळी पोलीस पार्टीचे 2 जवान शहीद व 05 जवान जखमी झाले होते.  तसेच सन 2018 मध्ये मौजा मुरडोंडा रोडवर झालेल्या भुसुरुंग स्फोट (एमपीव्ही) मध्ये त्याचा सहभाग असून त्यात पोलीस पार्टीचे 2 जवान शहीद व 5 जवान जखमी झाले होते. यासोबतच सन 2018 मध्ये मौजा झारापल्ली जं.प. चकमकीमध्ये त्याचा सहभाग असून यामध्ये पोलीस पार्टीचे 3 जवान शहीद 7 जवान जखमी व मौजा कोंडास्वाल रोडवर चकमक/हमल्यामध्ये पोलीस पार्टीचे 1 जवान शहीद झाले होते.  तसेच सन 2020 मध्ये मौजा एर्रान जंगल परिसरातील चकमकीमध्ये त्याचा सहभाग असून यामध्ये पोलीस पार्टीचे 2 जवान शहीद व 7 जवान जखमी झाले होते तसेच मौजा मिनपा चकमक/हमल्यामध्ये त्याचा सहभाग असून त्यात पोलीस पार्टीचे 17 जवान शहीद व 20 पोलीस जवान जखमी झाले होते.

        खुन – 5

     सन 2018 मधील मौजा झारा (कुतुल एरिया) येथील 01 इसम, सन 2020 मधील मौजा गुमगुडेम येथील 1 इसम, मौजा गोंडभटुम येथील 1 इसम व मौजा कोमाट येथील 1 इसम तसेच सन 2023 मधील मौजा झारा (नेलनार) येथील 1 इसम अशा एकुण 05 निरपराध इसमांच्या खुनात तो प्रत्यक्षरित्या सहभागी होता. 

        जाळपोळ – 1

     सन 2022 मध्ये मौजा झोरी येथील रोड कामावरील 2 (1 ट्रक व 1 टेम्पो) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता.

        रोड खोदकाम – 2

     सन 2015 मध्ये पामेड पासुन तेलंगणाकडे जाणा­या रोडवर तसेच सन 2023 मध्ये मौजा ओरच्छा ते धनोरा (छ.ग.) रोडवर खोदकाम करण्यात त्याचा सहभाग होता.

 

आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

1)      दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात.  प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात.  जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.

2)      वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

3)      दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही.

4)      पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे.

5)      खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.

6)      नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.     

 नामे टुगे कारु वड्डे

       दलममधील कार्यकाळ

1) सन 2012 ला जाटपूर दलम जनमिलीशीय सदस्य पदावर भरती होऊन सन 2023 पर्यंत कार्यरत राहुन घरी परत आला होता.

       कार्यकाळात केलेले गुन्हे

        खुन – 6

     सन 2020 मधील मौजा नंगुर व मौजा कवंडे येथील 02 इसम, सन 2021 मधील मौजा झारामरका येथील 1 इसम, मौजा परकेली येथील 1 इसम व मौजा कवंडे येथील 1 इसम तसेच सन 2022 मधील मौजा नंगूर येथील 1 इसम अशा एकुण 06 निरपराध इसमांच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभागी होता.

        जाळपोळ – 1

     सन 2022 मध्ये मौजा ईरपनार (म.रा.) येथील रोड कामावरील 12 (ट्रॅक्टर, जेसीबी) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता. 

आत्मसमर्पीत होण्याची कारणे. 

1)      शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळत नाही.

2)      वरिष्ठ कॅडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्वत:च्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ

       माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही.

3)          छत्तीसगड, महाराष्ट्र मधील नक्षलवाद्यांना वरच्या पदापर्यंत जाण्याची संधी मिळत नाही.

4)      महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावीत झाल्यामुळे. 

       महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

1)      महाराष्ट्र शासनाने अडमा जोगा मडावी याचेवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

2)      महाराष्ट्र शासनाने टुगे कारु वड्डे याचेवर 2 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. 

       आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.

1)      आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अडमा जोगा मडावी यास एकुण 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

2)      आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन टुगे कारु वड्डे याला एकुण 4 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

माओवादी जसे सांगत आले की, आमचा लढा हा जनतेसाठी आहे, तो कधी जनतेसाठी नव्हताच.  सप्ताहाच्या नावाखाली गरीब आदिवासींची पिळवणूक करणे, ठेकेदारांकडुन खंडणी गोळा करणे, वर्चस्व गाजवणे, देशविघातक कृत्य करणे यासाठीच फक्त त्यांचा लढा आहे.  त्यामुळे गडचिरोली पोलीस दल सर्व जनतेला आवाहन करते की, माओवाद्यांच्या खोट¬ा व फसव्या तथाकथीत क्रांतीला बळी पडू नये. 

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2023 सालामध्ये आतापर्यंत एकुण 12 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन  पोलीस अधीक्षक गडचिरोली  नीलोत्पल यांनी  केले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.