देश विदेश
जंगलाचा राजा टी-९ चा मृत्यू !

नागझीरा, प्रतिनिधी :-
देशात गाजलेल्या टी-९ उर्फ़ बाजीराव वयाच्या १२ व्या वर्षी क्षेत्र झुंजीत मृत पावला आहे. टी-९ हा नर वाघ मूळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वन परीक्षेत्रातील वाघ होता.
माहे डिसेंबर-२०१६ मध्ये हा वाघ ताडोबा वरून वाघांच्या नियमित नैसर्गिक भ्रमण मार्गाने नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा जंगलात स्थलांतर करून आला होता. तब्बल ९ वर्ष त्याने या जंगलावर आपले अधिराज्य गाजवले.




