देश विदेश

देशातील कर्मचारी आंदोलन करणार – राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

केंद्र सरकारच्या विरोधात देशातील सर्व कर्मचारी राष्ट्रव्यापी आंदोलन करणार आहे अशी घोषणा अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी आज गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केली. पुढल्या महिन्यात केंद्र सरकार विरोधात कर्मचारी असा संघर्ष होणार आहे.

देशात ४०० पार चे स्वप्न पाहणाऱ्यांना २४० वर थांबावं लागलं यासाठी देशातील कर्मचारी वरील अन्यायकडे दुर्लक्ष करणे भोवले आहे. जुनी ओपीएस ची मागणी ही असतांना शासनाने एनपीएस पेक्षा घातक युपीएस आणून केंद्र शासनाने कर्मचारी वर अन्याय सुरूच ठेवलं आहे. ८ वे वेतन आयोग लवकर लागू करावे. कोरोना काळातील निवृत्त कर्मचारी यांना १८ महिन्याचे महागाई भत्ता दिलेला नाही तो देण्यात यावे.

या पत्रकार परिषदच्या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य सरकारी समन्वय समिती महाराष्ट्रचे निमंत्रक विश्वासजी काटकर, उमेशचंद्र चिलबुले, एकनाथ ढाकणे, दामोदर पटले, रतन शेंडे, कवीश्वर बनपुरकर आदी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

 सध्या देश विश्वगुरू होत असल्याच्या वल्गना सत्ताधारी करत असले, तरी सरकारी कामांचा डोलारा सांभाळणाऱ्या सरकारी यंत्रणेत कर्माचाऱ्यांची कमतरता ठळक दिसून येत आहे. संपूर्ण देशात कर्मचाऱ्यांची तब्बल एक कोटीपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. सगळे सरकारी कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे सरकारविऱोधात लवकरच आंदोलनाची बिगुल वाजवण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघ, दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनीआज गडचिरोली पत्रकार परिषदेत येथे दिली.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचा सेवापूर्ती गौरव सत्कार सोहळा १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघ, दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी या सोहळ्याची माहिती देतानाच देशाची सध्याची स्थिती सांगत सरकारी धोरणांवर कडाडून टीका केली.

सुभाष लांबा म्हणाले की, उमेशचंद्र चिलबुले यांचे कार्य कर्मचारी संघटनेत उल्लेखनीय आहे. पण या सोहळ्यात आम्ही  पुढच्या आंदोलनाची घोषणासुद्धा करणार आहोत. सध्या सरकारविरोधात सरकारी कर्मचाऱ्यामध्ये नाराजी आहे. ८ व्या वित्त आयोगाबद्दल सरकार बोलायला तयार नाही. देशात सरकारी कर्मचाऱ्यांची

एक  कोटीपेक्षा अधिक जागा रिक्त आहे. फक्त कंत्राटी भरती होत आहे. देशाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे. सरकार उद्योगपतींना सूट आणि गरीबांवर आर्थिक भार देत आहे. देशातील  १० टक्के लोकांकडे ७७ टक्के संपत्ती आहे, तर १ टक्क्याकडे देशाची ४० टक्के संपत्ती आहे. त्यामुळे श्रीमंत आधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब  होत आहे. सरकारने उद्योगपतींचे १८ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे.

आता याची भरपाई करण्यासाठी सरकार विविध करांत वाढ करत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जात आहेत. पेन्शन योजनेची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. बेरोजगारी प्रचंड वाढत असताना अग्नीवीर सारख्या विचित्र योजना आणल्या जात आहे. या अग्नीवीर योजनेत बाप सेवानिवृत्त होण्याआधी मुलगा सेवानिवृत्त होतो.

कर्मचारी चे राष्ट्रीय नेते, गडचिरोली जिल्ह्याचे सुपुत्र उमेशचंद्र चिलबुले यांचा दिनांक १ फेब्रुवारी २५ ला गडचिरोली येथे सेवापूर्ती गौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील कर्मचारी यांच्या साठी ते अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या सेवापूर्ती गौरव सत्कार या कार्यक्रम करिता देशातील अनेक राष्ट्रीय कर्मचारी नेते हे गडचिरोली येथे येणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी यांनी या कार्यक्रम ला उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकार रेल्वे, विमान, वीज सगळे सरकारी उद्योग विकत आहे. २५० कोटी नफा देणारी हरीयाणा येथील वीज कंपनी सराकारने नुकतीच विकून टाकली. खरेतर सरकारी संपत्ती विकण्याचा अधिकार कुणाला नाही. पण हे राजरोस घडत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर पूर्वी नेहमी आंदोलने व्हायची. पण आता येथे आंदोलन करण्यावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रव्यापी आंदोलन करू, असेही लांबा म्हणाले.

या पत्रकार परीषदेला संघटनेचे उमेशचंद्र चिलबुले, विश्वास काटकर, एकनाथ ढाकणे, कवीश्वर बनपुरकर, खुशाल नेवारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विश्वास काटकर यांनी महाराष्ट्रात ८३ हजार कंत्राटी कर्मचारी असून त्यांची सेवा १० वर्षांची होऊनही त्यांना कायम करण्यात आले नाही. तर उमेशचंद्र चिलबुले म्हणाले की, महाराष्ट्रात  तब्बल अडीच लाख पदे रिक्त आहेत.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker