महाराष्ट्र
५ फेब्रुवारीला गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग टि २० भव्य उदघाट्न सोहळा

गडचिरोली,प्रतिनिधी:-
लॉर्डइस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) तर्फे आयोजित गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा रोजी येथे गडचिरोली येथे मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. LMEI, चे कार्यकारी संचालक एस. एस. खांडवाला यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गडचिरोली शहरातील MIDC परिसरात भव्य स्टेडियम उभारण्यात येत असून या स्पर्धेचे उद्घाटन भारताचे माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक तथा समालोचक रवी शास्त्री हस्ते होणार आहे. बी. प्रभाकरन, व्यवस्थापकीय संचालक, लॉईड्स मेटल्स यांच्या उपस्थितीत होणार आहे.
उद्घाटन सोहळा दुपारी ३:३० वाजता सुरु होईल. जिथे रवि शास्त्री यांना मुख्य अतिथी म्हणून सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा भव्य मार्च पास्ट होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केला जाणार आहे, जो संपूर्ण सोहळ्याचा मुख्य आकर्षण असेल,
पहिला साखळी सामना संध्याकाळी ५:०० वाजता सुरु होईल, जिथे लॉईड्स संघ खेळणार आहे. दुसरा सामना रात्रौ ८.३० वाजता होईल. ६ फेब्रुवारीपासून पुढील सर्व सॉमने या वेळा पत्रकानुसार होणार आहेत
पहिला सामनाः दुपारी ४:०० संध्याकाळी ५.००
दुसरा सामना संध्याकाळी ५:३० रात्री १० वाजेपर्यंत
बैठक व्यवस्था असलेले स्टेडियम उभारले जात आहे.
१० हजार क्रिकेट प्रेमी रोज उपस्थित राहतील.
निशुल्क प्रवेश राहणार आहे.
या स्टेडियम मध्ये सर्व सुविधा राहणार आहे.
या स्पर्धेत स्थानिक क्रिकेटपटूना प्राधान्य देण्यात येणार आहे..
दिवस रात्र स्पर्धा फ्लड लाईट मध्ये होणार आहे.
शहरातील चार भागातून स्टेडियम पर्यंत मोफत बस सेवा राहणार आहे.
बस स्टॅन्ड, इंदिरा चौक, राधे बिल्डिंग चामोर्शी रोड, आय टी आय चौक गडचिरोली येथून बस सेवा निशुल्क राहणार आहे.
या स्पर्धेत ५० हजार क्रिकेट प्रेमी प्रेक्षक उपस्थित राहून क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेणार आहेत.
या स्टेडियम परिसरात अनेक खान पान चे निशुल्क दुकान लागणार असून यांना बाजार भावा पेक्षा जास्त किंमत आकारता येणार नाही.



