आपला जिल्हा

धानोरा मा.मा. तलाव, 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

 धानोरा,प्रतिनिधी :-

सध्या पावसाळा सुरु असल्याने सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दिनांक 21 जुलै 2023 रोजी धानोरा (हेटी) येथील जलसंपदा विभागांतर्गत असलेला मा.मा. तलाव 100 टक्के भरलेला आहे. पुढील काही दिवस हवामान खात्याने पावसाची शक्यता दर्शविलेली आहे. त्यामुळे सांडव्यावरुन विसर्ग वाहण्याची शक्यता आहे.

तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरीकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्याची विनंती करण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी कळविले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker