ताज्या घडामोडीदेश विदेश

सावधान! बाटलीत पेट्रोल नेणाऱ्यांची आता खैर नाही; इंडियन ऑईलचे कडक निर्देश!

उदय धकाते 

गडचिरोली :-

अनेकदा गाडीतील पेट्रोल संपल्यावर आपण बाटली किंवा प्लास्टिकच्या कॅनमध्ये पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर जातो. मात्र, आता असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने पेट्रोल पंपांवर बाटली किंवा अनधिकृत डब्यांमध्ये इंधन देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहक आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून बाटल्यांमध्ये पेट्रोल घेतात. मात्र, अलीकडच्या काळात अशा प्रकारे बाटलीत नेलेल्या इंधनाचा दुरुपयोग झाल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

काय आहेत नवीन मार्गदर्शक तत्वे ?

  बाटलीत पेट्रोल देण्यास सक्त मनाई: प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन किंवा ‘PESO’ कडून मान्यता नसलेल्या कोणत्याही डब्यात पेट्रोल (MS) देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

  कडक अंमलबजावणी :- सर्व अधिकृत डीलर्सना या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  झोन झिरो (Zone Zero) नियम: पेट्रोल पंपावरील अतिसंवेदनशील भागात (उदा.पेट्रोल पंप नजीक) कोणाशीही वाद किंवा चर्चा करण्यास मनाई आहे.

  अग्निशमन यंत्रणा: पंपावरील सर्व अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अतिशय तातडीची परिस्थिती असेल तर काय ?

जर खरोखरच एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तर आवश्यक परवानगी घेऊन केवळ मान्यताप्राप्त डब्यातच (Approved Container) इंधन दिले जाईल. मात्र, हे इंधन थेट ग्राहकाच्या हातात न देता, पंपावरील अधिकृत प्रतिनिधीच्या देखरेखीखाली संबंधित वाहनाच्या टाकीतच ओतले जावे, असा नियम करण्यात आला आहे.

नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन इंडियन ऑईलतर्फे करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker