आरोग्य व शिक्षण

गोकुळनगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे  लोकार्पण

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील गोकुळनगर वार्डात येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे  लोकार्पण खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी, माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, डॉक्टर अनिल रुडे, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनतेसाठी आपला दवाखाना सुरू करण्यात आला.

सर्वसामान्य लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिक क्षेत्रामध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची तपासणी करावी असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

आज आपल्या गडचिरोली शहरामधील गोकुळनगर येथे या आपल्या दवाखान्याचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते, आमदार डॉक्टर देवरावजी होळी, माजी नगराध्यक्षा सौ.योगिताताई पिपरे, प्रमोदजी पिपरे, मुख्याधिकारी पिदूरकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल रुडे, यांचेसह नगर परिषदे व आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker