महाराष्ट्र
मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री व मंत्रीसह जिल्हा दौऱ्यावर

गडचिरोली,प्रतिनिधी :-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी 11.00 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमास एम.आय.डी.सी. मैदान कोटगुल रोड, गडचिरोली येथे दोन उपमुख्उयमंत्परी व एक मंत्री सह उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत),गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पार पाडणार आहेत.




